गडचिरोलीविदर्भ

‘ग्राहक मित्र गौरव’ पुरस्कारांनी लोकसेवकांचा सन्मान; जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्यांचे मार्गदर्शन ; फसवणूक झाल्यास ग्राहकांनी दाद मागण्याचे आवाहन

गडचिरोली : “ग्राहकांनी आपले हक्क आणि कर्तव्यांप्रती जागरूक राहणे हीच काळाची गरज आहे. आपली कुठेही फसवणूक झाल्यास डगमगून न जाता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागावी,” असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या प्रतिभा पाटील यांनी केले. १५ मार्च या जागतिक ग्राहक हक्क दिनाचे औचित्य साधून शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे आयोजित विशेष कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

या कार्यक्रमाचे आयोजन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन शाखा, शिवाजी महाविद्यालय आणि शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गोकुळनगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, जनतेचा रोष पत्करूनही प्रामाणिक सेवा देणाऱ्या लोकसेवकांचा आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा ‘ग्राहक मित्र गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विद्युत विभाग: विवेक परचाके, आकाश बावणे, दिनेश खारकर. दूरसंचार विभाग: माकडे. गॅस सेवा: सूर्यकांत करकाडे (एचपी गॅस). संशोधन व साहित्य: संगीता ठलाल (रानभाज्या संशोधन ग्रंथ लेखिका). इतर मान्यवर: प्रतिभा चौधरी, धनंजय पत्रे, रूपचंद फुलझेले, प्रवीण घाटे, संजय धकाते, चंद्रशेखर भडांगे, प्राचार्य अरुण मुनघाटे आणि प्रफुल्ल बिजवे. यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या माधुरी आटमांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी आयोगाचे प्रबंधक कमलेश तुमसरे आणि वैध मापन अधिकारी रूपचंद फुलझेले यांनी आयोगाच्या कामकाजाची आणि वजन मापातील त्रुटी ओळखण्याची कार्यपद्धती सविस्तरपणे समजावून सांगितली. प्रास्ताविकात प्राचार्य अरुण मुनघाटे यांनी ग्राहक संकल्पना आणि ग्राहकांनी घ्यावयाची दक्षता यावर प्रकाश टाकला.

व्यासपीठावर जिल्हा ग्राहक परिषदेचे अशासकीय सदस्य प्रवीण घाटे, चंद्रशेखर भडांगे, शिवाजी शिक्षण संस्थेचे सहसचिव गोविंदराव बानबले, सदस्य शरद पाटील ब्राह्मणवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी महाविद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी, तसेच मानवाधिकार प्रशासन जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ग्राहकांमध्ये नवीन जाणीव जागृती निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button