गडचिरोलीविदर्भ

सिरोंचा तालुक्यातील २५ शाळा ‘तंबाखूमुक्त’ ; मुक्तीपथ अभियानाचा पुढाकार

गडचिरोली : भावी पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी सिरोंचा तालुक्यात मुक्तीपथ अभियानातंर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तालुक्यातील ५६ शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम घेण्यात आले असून, आवश्यक ११ निकषांची यशस्वी पूर्तता करणाऱ्या २५ शाळांना २०२५-२६ सत्राकरिता ‘तंबाखूमुक्त शाळा’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मुक्तीपथ तालुका संघटिका सुनीता भगत, उपसंघटक शंकर गागुरी व त्यांच्या टीमने तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मनोरंजनात्मक खेळ आणि व्यसनविरोधी गीतांच्या माध्यमातून दारू व तंबाखूचे मानवी शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम पटवून देण्यात आले. तसेच ‘कोटपा’ (COTPA) कायद्याची माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ देण्यात आली. तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले ११ निकष अत्यंत महत्त्वाचे आहेत. शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी, जनजागृती फलक आणि शिक्षक-विद्यार्थ्यांचा सहभाग यावर मार्गदर्शन करण्यात आले. स्वतःसोबतच शाळा परिसर स्वच्छ आणि व्यसनमुक्त ठेवण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला.

तालुक्यातील श्रीनिवास हायस्कूल अंकिसा,  भगवंतराव आश्रम शाळा असरल्ली,  राजे धर्मराव शाळा असरल्ली, आंबेडकर विद्यालय नदीकुडा, शासकीय आश्रम शाळा  व्यंकटपूर, संत मानवदयाल बामणी, संत मानवदयाल रंगायपल्ली, बाल विद्यालय नरसिंहपल्ली, भगवंतराव हायस्कूल नरसिंहपल्ली, भगवंतराव जुनीयर कॉलेज सिरोंचा, शासकीय आश्रम शाळा सिरोंचा, शासकीय आश्रम शाळा झिंगानूर,भगवंतराव निवासी शाळा, सिरोंचा, सी.व्ही. रमन कॉलेज सिरोंचा, भगवंतराव महाविद्यालय सिरोंचा, भगवंतराव कॉलेज टेकडा, जिल्हा परिषद शाळा तुमनूर, जिल्हा परिषद शाळा लांबडपल्ली दिजीनीलँड शाळा सिरोंचा, जिल्हा परिषद शाळा कोटमाल, जिल्हा परिषद शाळा नरसिंहपल्ली, शासकीय आश्रम शाळा बामणी, जिल्हा परिषद शाळा सिरकोंडा, जिल्हा परिषद शाळा झिंगानूर या शाळांनी संपूर्ण निकष पूर्ण करीत आपली शाळा तंबाखुमुक्त केली आहे. इतरही शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्गाने सुद्धा ११ निकष पूर्ण करून आपली शाळा तंबाखूमुक्त ठेवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button