गडचिरोलीविदर्भ

ट्रकची उभ्या ट्रकला धडक ; चालक ठार

आष्टी : सुरजागड येथील लोहखनिज घेऊन रायपूरकडे जाणाऱ्या उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने अनखोडा, उमरी गावाजवळ धडक दिली. यात चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारला रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

मोहित यादव (२६, रा. कोईलरी, मध्यप्रदेश) असे मयताचे आहे. सूरजागड येथून लोहखनिज घेऊन जाणारा ट्रक (एमएच ३४ बी झेड २३७७) आष्टी मार्गे रायपूरकडे जात होता. उमरी गावाजवळ मेंढ्यांचा कळप रस्ता ओलांडत असल्याने सदर ट्रक रस्त्यावर थांबलेला होता. त्याच्या मागून दुसरा ट्रक एमएच ४० सी १२८५) वेगाने येत होता. पुढे ट्रक थांबलेला दिसला तेव्हा गाडीचा वेग कमी करताना नियंत्रण सुटले आणि समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. यात ट्रकच्या कॅबिनचा चुराडा झाला.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक विशाल काळे हे सहकाऱ्यांसमवेत दाखल झाले. केबिनमध्ये फसलेल्या चालकाला बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button