चंद्रपूरविदर्भ

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

राजीव गांधी नगर (वडाळा) परिसराती घटना ; दोन चिमुकल्या मुलींचे मातृछत्र हरपले

चिमूर : शहरातील राजीव गांधी नगर (वडाळा) परिसरात एका ३८ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. शुक्रवारी (१० एप्रिल) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. नीलम मुरलीधर ननावरे (३८)असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आईच्या जाण्याने दोन चिमुकल्या मुलींचे मातृछत्र कायमचे हरपले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नीलम ननावरे या आपल्या पती आणि दोन मुलींसह राजीवनगर येथे वास्तव्यास होत्या. त्यांचे पती गोंदेडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी कुटुंबातील सदस्य बाहेर असताना नीलम यांनी बेडरूममध्ये पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास काहीतरी अघटित घडल्याचा संशय शेजाऱ्यांना आला. त्यांनी तातडीने नातेवाइकांना पाचारण केले. नातेवाइकांनी घरी येऊन दरवाजा उघडला असता, बेडरूममध्ये धक्कादायक दृश्य दिसले. पंख्याला बांधलेली ओढणी तुटलेल्या अवस्थेत होती, तर बेडवर खुर्ची आणि खाली नीलम यांचा मृतदेह पडून होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नीलम ननावरे यांना मृणाली (१२ वर्षे) आणि आरोही (१० वर्षे) अशा दोन लहान मुली आहेत. आईच्या जाण्याने या चिमुकल्यांचे मातृछत्र कायमचे हरपले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button