गडचिरोलीविदर्भ

अम्ब्रीशराव आत्राम यांनी अपघातग्रस्त दुर्गम कुटुंबीयांची घेतली भेट

आर्थिक मदतीसह मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली ; आत्राम यांच्या संवेदनशीलतेचे परिसरात कौतुक

सिरोंचा : सिरोंचा तालुका दौऱ्यावर असताना टेकडा येथील महेश मयसय्या दुर्गम यांच्या अपघाती निधनाची दुर्दैवी वार्ता समजताच, अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी तात्काळ दुर्गम कुटुंबाचे निवासस्थान गाठले. या कठीण प्रसंगात त्यांनी शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना मानसिक व आर्थिक आधार दिला.

राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दुर्गम कुटुंबातील सदस्यांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. “या कठीण काळात तुम्ही एकटे नाही, संपूर्ण परिसर तुमच्या पाठीशी आहे,” अशा शब्दांत त्यांनी कुटुंबाला दिलासा दिला. केवळ सांत्वन करून न थांबता, राजेंनी या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदतही सुपूर्द केली.

महेश दुर्गम यांच्या निधनामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राजेंनी मोठी घोषणा केली. दुर्गम कुटुंबातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य आपण करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मुलांच्या भविष्यासाठी भक्कम आधार निर्माण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केल्यामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

नेहमीच जनसामान्यांच्या सुखादुखात धावून जाणाऱ्या राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी कृतीमुळे संपूर्ण सिरोंचा परिसरात त्यांच्याविषयी आदराची भावना अधिक दृढ झाली आहे. याप्रसंगी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, दुर्गम कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button