गडचिरोलीविदर्भ

महिलांनी स्वावलंबी व्हावे – राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांचे प्रतिपादन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांचा सन्मान ; माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी यांची उपस्थिती

गडचिरोली : आजच्या युगातील स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याहीपेक्षा दोन पाऊल पुढे जात आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यामुळे महिलांनी स्वावलंबी होऊन महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात, जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला महिला सन्मान सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेले आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या कल्पना तिजारे, महिला जिल्हा कार्याध्यक्षा सुषमा येवले, रुषाली भोयर, गडचिरोली तालुका अध्यक्ष विवेक बबनवाडे, आरमोरी तालुका अध्यक्ष अमीन लालानी, कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, गडचिरोली शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, आरमोरी शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय शिंगाडे, आरमोरी तालुका महिला अध्यक्षा संगीता मेश्राम, गडचिरोली शहर अध्यक्षा प्रीती कोवे, आरमोरी शहर अध्यक्षा जयश्री भोयर यांची उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी आपल्या मार्गदर्शनात राज्य सरकारद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महिला व बालविकास विभागाच्या वतीने अभूतपूर्व लाडकी बहीण योजना आणलेली असून या योजनेमुळे महिलांचे जीवनमान उंचावले असल्याचे सांगितले.

यावेळी, पोलीस, परिचारिका, स्वच्छतादूत म्हणून काम करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ व उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अमोल कुळमेथे, प्रास्ताविक सुषमा येवले, तर आभार प्रदर्शन सुनील नंदनवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button