क्राईमगडचिरोलीविदर्भ

देशी-विदेशी दारू जप्त, पुराडा येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल

पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई

कुरखेडा : तालुक्यातील पुराडा येथे पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या कारवाई करीत एका घरातून देशी-विदेशी दारू जप्त करीत जयदेव गहाणे नामक विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुराडा पोलिस मदत केंद्रांतर्गत पुराडा या गावाचा समावेश आहे. या गावात 6 ते 7 दारूविक्रेते असून चोरट्या मार्गाने दारू विक्री करतात. दारूविक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली. तरी सुद्धा काही विक्रेते अवैध व्यवसाय करीत आहेत. अशातच पोलिस व मुक्तिपथ टीमने दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम राबवली असता, एका घरी देशी विदेशी दारू मिळून आली. यामध्ये 11 नग विदेशी दारू व 25 नग देशी दारूचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस कर्मचारी सुखदेव उईके, कुमारशहा काटेंगे, रोशन लसुने, अनिशा बांबोळे यांनी केली. यावेळी मुक्तिपथतर्फे शारदा मेश्राम, जीवन दहिकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button