गोंदियाविदर्भ

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; तिघे ठार, एक गंभीर

रावणवाडी येथील हळदी फॅक्ट्रीजवळील घटना 

गोंदिया : रावणवाडी येथील हळदी फॅक्ट्रीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता घडली, महेंद्र भोजराज ठाकरे (३३, रा. चिचगाव ता. गोरेगाव) व रेखलाल नगांजी पटले (६५, रा. गोपालपूर ता. किरणापूर) व कमलेशपुरी सुरजपुरी गोस्वामी (रा. नैनपूर मंडला, मध्यप्रदेश) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

गोंदिया-बालाघाट मार्गावरील रावणवाडी येथील हळदी फॅक्ट्रीजवळ एमपी ५१ एम.एच.२९५२ या मोटारसायकलला आरोपी कमलेशपुरी सुरजपुरी गोस्वामी याने हलगर्जीपणे चालवून रावणवाडीकडून अर्जुनीकडे जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम.एच. ३५ एन ४२७४ ला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरून ट्रीपलसिट जाणारे महेंद्र ठाकरे, रेखलाल पटले व राजकुमार कटरे हे दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर झाला. या भीषण अपघातात दोन्ही मोटारसायकलचा चुराडा झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमीला तातडीने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब), १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नावकर करीत आहेत.

अर्जुनी येथील राजेश अमृतलाल रहांगडाले (२८) यांच्या आजोबाची तेरवी असल्याने त्या तेरवीच्या कार्यक्रमाला महेंद्र भोजराज ठाकरे (रा. चिचगाव ता. गोरेगाव) व रेखलाल नंगाजी पटले हे जात होते. कार्यक्रमाला जात असतानाच ही घटना घडल्याने ठाकरे व पटले यांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button