
आरमोरी : आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी तालुक्यातील मौजा पाथरगोटा येथे भेट देऊन गावातील नागरिकांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या आणि अडीअडचणी जाणून घेतल्या. गजबे यांनी उपस्थित नागरिकांशी गावाच्या विकासासंबंधी तसेच इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.
यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासोबत अशोक दोनाडकर, वेंकट चौधरी, शंकर नखाते, काशिनाथ दोनाडकर, केवळराम प्रधान, मोतीलाल लिंगायत, मोरेश्वर मेश्राम, कैलास दोनाडकर, संतोष प्रधान, हिवराज बुल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



