
अहेरी : स्थानिक श्री शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालयात 5 सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ‘सांस्कृतिक’ विभागातर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी विभाग प्रमुख प्रा. जी.डी. जंगमवार यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डी.एम. उत्तरवार तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. पी.व्ही. घोडेस्वार होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये 10 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शैलेजा राऊत हिने प्रथम क्रमांक तर काजल पल्लो हिला द्वितीय क्रमांक पटकाविला. याप्रसंगी डॉ. आर.बी. घोनमोडे यांनी गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
डॉ. आर.डी. हजारे यांनी भारतीय ज्ञान परंपरेतील गुरु शिष्य परंपरेचा इतिहास विविध उदाहरणांनी स्पष्ट केला. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करावे व झटावे तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श समोर ठेवावा असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार आणि सचिव प्रशांत पोटदुखे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. आर.पी. घोणमोडे यांनी तर आभार डॉ. एस. के. वाघ यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. सी.एन. गोरकार, प्रा. डी.एम. आवारी, प्रा. एस.आर. लांडे, प्रा. ए.एन. सहारे, प्रा. जी.सी. तेलंग, प्रा. योगेंद्र काटकर, प्रा. पी.सी. जवादे, प्रा. पूजा मेश्राम यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सुमारे 100 विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्यांनी सर्व प्राध्यापकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



