गडचिरोलीविदर्भ

आश्रमशाळा प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना मिळणार ४३००, ४८०० ग्रेड पे प्रमाणे वेतन

आ. अडबाले, आ. वंजारी व आ. मसराम यांनी वेधले लक्ष : प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांची घेतली भेट 

गडचिरोली : शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. अभिजीत वंजारी, आरमोरी मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांनी शिक्षकांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांची गुरुवार, १८ जून रोजी प्रकल्प कार्यालयात भेट घेऊन गडचिरोली प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना ४३०० ग्रेड पे व अनुदानित आश्रम शाळेतील माध्यमिक शिक्षकांना ४८०० ग्रेड पे देण्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी बाबत विचारणा केली. चर्चेअंती सदर वेतन देण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी मान्य केले.

सीटू संलग्नित शासकीय व अनुदानीत आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेद्वारे शिक्षकांनी आमदार सुधाकर अडबाले, आमदार ॲड. अभिजीत वंजारी व आमदार रामदास मसराम यांची भेट घेऊन गडचिरोली प्रकल्पात प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षकांच्या ग्रेड वेतनाबाबत निर्माण झालेल्या समस्येची जाणीव करून दिली. त्यानंतर तीनही आमदारांनी प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांची एकत्रित भेट घेऊन समस्या मांडल्यानंतर  प्रकल्प अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत २५ जून पर्यंत सदर ग्रेड वेतन प्रकरणे निकाली काढण्याचे मान्य केले.

यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे विभागीय सहसचिव (अनुदानित) विकास जनबंधू, विभागीय उपाध्यक्ष यादव धानोरकर, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, सतीश पवार, अंकलेश गणवीर, रविकांत पिपरे, धर्मेंद्र कुसराम, बालाजी पंडागळे, के.एम. तिडके, जी.जी. आलोने, रोशन पेंद्राम, लालसू महा, किरण बरडे, विनायक क्षीरसागर, विलास ढोंगे, सुनील राऊत, नीलकंठ उईके, मिलिंद कुंभारे, सचिन खोब्रागडे, पुराणिक गेडाम, शैलेश भैसारे, महेश बोरावार आदींसह शासकीय व अनुदानित आश्रम शाळांचे शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button