गोंदियाविदर्भ

टायर फुटल्याने ट्रॅव्हल्सची झाडाला धडक ; ४० प्रवासी थोडक्यात बचावले

गोंदिया : रायपूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सचे समोरील टायर अचानक फुटल्याने अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. जवळील मुरदोली गावाजवळ रविवारी (दि.२१) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे, तर इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

प्रवाशांनी गच्च भरलेली खासगी ट्रॅव्हल्स क्रमांक सीजी ०७- सीपी २८१२ सुमारे ४० प्रवाशांना घेऊन रायपूरकडून सोलापूरच्या दिशेने जात होती. जवळील मुरदोली गावाजवळ महामार्गावर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक बसचा समोरील टायर मोठ्या आवाजासह फुटले. टायर फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडर व दुसऱ्या बाजूचा रस्ता ओलांडून झाडावर जाऊन धडकली. झाडाला झालेली धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात अर्शद राशिद अहमद (३९, रा. भिलाई) हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अर्शदला तत्काळ रुग्णवाहिकेने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button