गडचिरोलीविदर्भ

कंत्राटदारांची कोटींची देयके प्रलंबित ; १ मार्चपासून कामबंद आंदोलनाचा इशारा

गडचिरोली : राज्यातील कंत्राटदारांच्या विविध संघटनांनी सरकारविरुद्ध प्रलंबित देयकांसाठी एल्गार पुकारला असून एक मार्चपासून राज्यभर विकासकामे बंद करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील कंत्राटदारांनीही येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत प्रलंबित देयकांपोटी ७०% रक्कम तातडीने वितरीत न केल्यास १ मार्च पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, जिल्ह्यात सा.बां. विभाग मागील सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांतील सर्व मंजुर कामे मोजमाप पुस्तकीसकट व कार्यालयीन प्रक्रीया सुध्दा पुर्ण झाली आहेत, याला आता एक वर्षाचा जास्त कालावधी झालेला आहे. त्या सर्व कामांचे ७०० कोटींचे देयके प्रलंबित आहे. आम्ही सर्व कंत्राटदार कर्जबाजारी झालो आहोत. मजुरांना मजुरी देऊ शकलो नाही याची आम्हाला खंत आहे. असे या अगोदर कधी झाले नव्हतेच. मागील एक वर्षांत फक्त १० % निधी देण्यात आला, त्या तुलनेत इतर जिल्ह्यात ३० ते ५०% निधी वितरीत करण्यात आला, गडचिरोलीतील कंत्राटदार किती दिवस हा अन्याय सहन करतील. येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत प्रलंबित देयकांपोटी ७०% रक्कम तातडीने वितरीत न केल्यास ०१ मार्च २०२५ पासुन सा.बां. विभागाची गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कामे प्रलंबित देयके मिळेपर्यंत बेमुदत बंद ठेवण्याचा व सा.बां. अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी विदर्भ कंत्राटदार असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय तुम्मावार, कार्यकारिणी सदस्य भूषण समर्थ, डाॅ. प्रणय खुणे, नंदू वायलालवार, देविकार व इतर पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button