गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत १४ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा

आ. धर्मरावबाबा आत्राम करणार मार्गदर्शन ; पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे रवींद्र वासेकर यांचे आवाहन 

गडचिरोली: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक विस्तारासाठी, प्रत्येक बूथपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्यासाठी आणि जिल्ह्यातील आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीची दिशा निश्चित करण्यासाठी येत्या मंगळवारी, १४ जुलै रोजी अभिनव लॉन, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे दुपारी १.०० वाजता भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात झालेल्या औद्योगिक प्रगतीचे शिल्पकार आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी सतत संघर्ष करणारे नेते डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत व उद्घाटनाने हा मेळावा संपन्न होईल. या मेळाव्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शेतकरी व शेतमजुरांसाठी उपलब्ध असलेल्या योजना, तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

यासह महिलांसाठीच्या विशेष योजना, आदिवासी व भूमिहीन नागरिकांसाठीच्या शासकीय सुविधा, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थित पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिशा दिली जाईल. आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि सामाजिक उपक्रम लक्षात घेता, गडचिरोली जिल्ह्यातील पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे हे या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. “संघटन मजबूत – जनतेचा विश्वास दृढ – विकासाचा नवा संकल्प” हे ब्रीद घेऊन प्रत्येक बूथपर्यंत पक्षाची ताकद कशी वाढवता येईल, यावर या मेळाव्यात सखोल चर्चा व रणनीती आखली जाणार आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मुख्य आयोजक व जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button