
गडचिरोली: देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने शिक्षक दिन उत्साहात साजरा केला. यावेळी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचा त्यांच्या योगदानाबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड. विश्वजित कोवासे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, माजी जि.प.सदस्य जगन्नाथ बोरकुटे, रोहिदास राऊत, प्रभाकर वासेकर, अॅड.राम मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक देवा सोनटक्के, दत्तात्र्यय खरवडे, रामकृष्ण ताजने, समशेरखान पठाण, लिना पठाण, मनोहर नवघडे, तसेच करोडकर, मस्के, बाणबले, शिंदे, पुडके, निशाणे, अलयनकर, बेहरे, महेंद्र भगवान, शाह काटेंगे, एम.भोयर, रुपचंद आकरे, प्रकाश सोनवणे, कृष्णराव नारदेलवार, किशोर झाडे, रमेश गडपायले, राजेंद्र हिवरकर, प्रकाश दुधे, आनंदराव पारधी, ज्ञानेश्वर मामोडवार, झाडे सर, गोडबोले, माधुरी मडावी, राधेशाम भोयर, शिरणकर, शिक्षिका झाडे, अलोणे, शिक्षक रोकडे, आर.एल. चौधरी यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणातूनच समाज परिवर्तन शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक परिस्थितीतही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उत्तम संस्कार दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा यशस्वी झाला.



