गडचिरोलीविदर्भ

कोरची येथे आ. कृष्णा गजबे यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन

कोरची : आरमोरी विधानसभेतील महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार कृष्णा गजबे यांच्या कोरची येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विधानसभा निवडणूक प्रमुख तथा सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचे हस्ते पार पडले. यावेळी महायुतीचे भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

काँग्रेसच्या काळात कोणत्याही योजना थेट लोकापर्यंत पोहचत नव्हते मात्र महायुती सरकार येताच शासनाच्या अनेक योजना लोकांपर्यंत थेट पोहचत आहेत. लाडकी बहिण योजनेतून प्रत्येक महिलांना 1500 रुपये थेट खात्यात जमा करण्यात येत आहेत तर शेतकऱ्यांना कृषि बिल माफ झाले तर अनेक विकास कामे कोरची तालुक्यात आमदार कृष्णा गजबे यांनी केले आहेत. महायुतीच्या वतीने तिसऱ्यांदा आमदार कृष्णा गजबे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथावर व गावात जोरात कामाला लागून आपले लाडके आमदार कृष्णा गजबे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा. असे प्रतिपादन सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी कोरची येथील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाई-पिरिपा महायुतीचे उमेदवार आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

यावेळी निवडणूक प्रमुख तथा सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, लोकसभा समन्वयक किसन नागदेवे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार  कृष्णा गजबे, आरमोरी विधानसभा समन्वयक श्रीनिवास, शिवसेना शिंदे गटाचे नारायण धकाते, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, सोहनसिंग मडावी प्रवासी कार्यकर्ते मध्यप्रदेश, आनंद चौबे जिल्हा सचिव भाजपा, प्राचार्य देवराव गजभे जिल्हा सचिव भाजपा, बबलूभाई हुसैणी जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी, नसरुद्दीन भामानी तालुकाध्यक्ष, कमलनारायण खंडेलवार तालुका उपाध्यक्ष भाजपा, संतोष गोंधळे विधानसभा प्रमुख, आसाराम शेंडे, राजेंद्र दीवटे शिवसेना, आणि इतर मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविक आनंद चौबे, संचालन देवराव गजभे तर कार्यक्रमाचे आभार नसरुद्दीन भामानी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button