गडचिरोलीविदर्भ

अवैध दारूविक्रीविरोधात महिला, पदाधिकाऱ्यांकडून होणार प्रयत्न

खरमतटोला येथे बैठक

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील खरमतटोला येथे पोलिस, मुक्तीपथ व ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेत त्यानुसार वाटचाल करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी गाव पदाधिकाऱ्यांसह महिला पुढाकार घेणार आहेत.

गावामध्ये वाढत्या दारूविक्रीमुळे व पिणाऱ्यामुळे गावात अशांतता निर्माण झालेली आहे. तरुण तसेच पुरुष मंडळी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे अनेक महिलांना पिणाऱ्यामुळे त्रास सहन करावे लागत आहे. गावामध्ये दारू विक्री केली जात असल्याने आजूबाजूच्या दारूविक्री बंद असलेल्या गावातील मध्यपी लोकांची वर्दळ असते. ही समस्या लक्षात घेता नुकतेच आयोजित बैठकीत अवैध दारूविक्रीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी गावामध्ये अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या 19 तारखेच्या ग्रामसभेमध्ये विक्रीबंदीचा  ठराव घेऊन त्याची अंमलबजावणी करत गावामधून रॅली काढून विक्रेत्यांना नोटीस देण्याचे ठरविण्यात आले. गावामध्ये सरपंच, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी सुद्धा निर्णयाला समर्थन करीत महिलांना पाठिंबा देण्याचे ठरविले.

या सभेमध्ये पोलीस विभागातर्फे पीएसआय संदीपकुमार बी. ताराम, राजकुमार ढोरे, मुक्तीपथ तर्फे एस. जे. मेश्राम, जीवन दहिकर, महेश खोब्रागडे, युवणाथ मेश्राम तसेच तमूस अध्यक्ष अमृत ठलाल, सरपंच विजय तुलावी, पोलिस पाटील गीता लोह्नंबरे, डोमा सुखदेवे, ज्ञानेश्वर लंजे, योगेश्वर नाटके, निलेश तुलावी, राजेंद्र डोकरमारे , शिशुकला लंजे, रोहिणी फटिंग, संतकला खोडपे, रंजना तुलावी, वंदना नाटके, शिल्पा सुखदेवे, निरंजना मेश्राम, संघमित्रा रामटेके, मनीषा लोणारे, लता बागडे, ऊषा डोकरमारे, वनिता सुखदेवे, मंदा तुलावी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button