गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

मुरखळा येथे आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन

चामोर्शी : तालुक्यातील मुरखळा (माल) येथील नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या उद्घाटन नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून सरपंच बुरे होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम, पर्यवेक्षक वानखेडे, उपसरपंच लक्ष्मी सालोरकर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बारसागडे, तंमुस अध्यक्ष राजूझाडे, डॉ. मिनाक्षी शिंदे, आरोग्यसेवक वावरे, आरोग्यसेविका अरुणा बोडावार, अंगणवाडी सेविका पुष्पा बुरे, सरिता बूरांडे, उषागेडाम, आशा स्वयंसेविका संगीता गुरूनूले, हर्षलता बुरे, शिंदे, सचिन तुंबडे, राकेश नैताम, माणिक घोगरे यासह नागरिक उपस्थित होते.

आरोग्य ही संपत्ती असून तिचा योग्यवेळी उपाय व उपचार करून निरोगी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीचा सदुपयोग करून जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन इमारत बांधकाम करण्यात आले. या भौतिक सुविधांचा पुरेपूर वापर करून आरोग्य व्यवस्था बळकट करण्यास निश्चितच मदत होईल, असे मुरखळाचे सरपंच भास्कर बुरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button