
देसाईगंज : तालुक्यातील चोप गावात आज प्रचंड उत्साहात कॉर्नर सभा आयोजित केली गेली. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आमदारांचे फुलांच्या भव्य हाराने आणि आरतीने स्वागत केले.
प्रचार जनसंवाद दौऱ्याची सुरुवात थोर संत श्री तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याला प्रणाम करून झाली. गावकऱ्यांनी आ. गजबे यांचे आगमन पाहून हर्षोल्हास व्यक्त केला. अनेक जेष्ठ नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांनी साहेबांना जवळ येऊन आलिंगन केले, तर काही जेष्ठ नागरिकांनी त्यांना दिक्या (डोक्यावरून हात फिरवून) शुभाशीर्वाद दिले.
आमदार गजबे गावात पोहोचताच वातावरण सणासारखे झाले. लोकांनी रांगोळ्या काढल्या, फुलांच्या उधळणीने त्यांचे स्वागत केले. बाजारातील ठिकाणी जाऊन त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
गावातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने साहेबांची आरती ओवाळून त्यांना शुभेच्छा दिल्या, तर लहान मुलांनी “आमदार साहेब की जय!” अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले.
आमदार गजबे यांनी प्रत्येक घरांमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या. गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
चोप येथे झालेल्या या जनसंवाद दौऱ्याने गावकऱ्यांमध्ये उत्साहाची नवी लाट निर्माण केली आहे. आमदार गजबे यांचे चोप गावातील स्वागत हा त्यांच्या लोकप्रियतेचा आणखी एक ठसा ठरला आहे.
दौऱ्याचे खास क्षण
रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग, नागरिकांचा आमदारांना आलिंगन आणि जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद, गावात सणासारखा उत्साह आणि जल्लोष, बाजारात व्यापाऱ्यांशी थेट संवाद.



