गडचिरोलीविदर्भ

भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा भव्य रोड-शो

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ गडचिरोली शहरात अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीत भव्य रोड-शोचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर यांचे या रोड-शोमध्ये विशेष आकर्षण ठरले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, महिला आणि तरुणाईने सहभाग घेतला. गडचिरोली शहरात उत्साहपूर्ण वातावरणात हा रोड-शो पार पडला.

याप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार तथा भाजपा नेते डॉ. नामदेवराव उसेंडी, शिवसेना नेते हेमंत जंबेवार, विधा. संयोजक प्रमोद पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कविता उरकुडे, शिवसेनेचे नेते राजु कावडे, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, मिलिंद घरोटे, संजय बारापात्रे, शिवसेनेच्या निता वडेट्टीवार, वैष्णवी नैताम, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके यांच्यासह महायुतीचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीने रोड-शोला एक वेगळाच रंगतदार अनुभव मिळाला. नागरिकांमध्ये माजी खासदार व उमेदवारांप्रती प्रचंड उत्साह आणि आत्मीयता दिसून आली. गडचिरोलीतील हा रोड-शो महायुतीच्या प्रचार मोहिमेत एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button