गडचिरोलीविदर्भ

देसाईगंजमध्ये ‘सेवा महोत्सव २०२६’ उत्साहात ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी आ. कृष्णा गजबे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

सिंधू भवनात २९ दात्यांचे रक्तदान; गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप अन् नगरसेवक बाळकृष्ण माडूरवार यांचा सत्कार

देसाईगंज : भारतीय जनता पार्टी (तालुका देसाईगंज) च्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘सेवा महोत्सव २०२६’ अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. सिंधू भवन, देसाईगंज येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिर आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात २९ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच गडचिरोली येथील रक्त संक्रमण अधिकारी व त्यांच्या टीमने विशेष सहकार्य केले. आयोजकांनी त्यांच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

यावेळी उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान देसाईगंज नगर परिषदेचे नगरसेवक बाळकृष्ण माडूरवार यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार कृष्णा गजबे व माजी भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, राजेश जेठाणी, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, नगराध्यक्ष लता सौंदरकर, नगर उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री प्रीती शंभरकर, माजी जि. प. सदस्या रोशनी पारधी यांच्यासह स्थानिक नगरसेवक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही भारतीय जनता पार्टीच्या वतीने अशाच प्रकारच्या लोकहिताच्या आणि समाजोपयोगी उपक्रमांचे निरंतर आयोजन करण्यात येईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button