गडचिरोलीविदर्भ

आलापल्ली येथे चक्रवर्ती महान सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आलापल्ली : आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली, महामाया महिला मंडळ, संघमित्रा वंदना मैत्री संघ आलापल्ली, ब्लूज युथ संघटन आलापल्लीच्या संयुक्त विद्यमाने संघमित्रा बुद्ध विहार, आलापल्ली येथे 5 एप्रिल रोज शनिवारला संध्याकाळी 7.00 वाजता “चक्रवर्ती महान सम्राट अशोक” यांची जयंती साजरी करण्यात आली.

संघमित्रा महिला वंदना मैत्री संघाच्या वतीने तथागत महाकारुनिक बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाना वंदन करून तसेच महान सम्राट, देवनामप्रिय राजा अशोक यांच्या प्रतिमाना माल्यर्पण करून कार्यक्रमाचा आरंभ त्रिशरण पंचशील वंदना सामूहिक ग्रहण करून करण्यात आला.

याप्रसंगी आदरणीय प्रा. संजय पथाडे, कोषाध्यक्ष भा. बौ. महासभा यांनी सम्राट अशोक यांच्या धम्मकार्याचा गौरंकित इतिहास आपल्या व्याख्यानातून सांगितला. याप्रसंगी बहुसंख्य समाज बांधव, बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होत्या. ब्लूज युथ संघटनच्या तरुणांनी महापुरुषाचे विशाल बॅनर, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनचे जागृती दर्शक बॅनरचे लोकार्पण फटाक्यांची आतिषबाजी करीत व जयघोष करीत मोठ्या उत्साहात तरुणांनी सम्राट अशोक जयंती साजरी केली. असा अभूतपूर्व जलोष आलापल्ली नगरात प्रथमच तरुणाकडून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव झाडें भा.बौ. महासभा जिल्हा संघटक यांनी तसेच बॅनरचे लोकार्पण कार्यक्रमाचे संचालन बी. एम. दुर्गम अध्यक्ष अहेरी तालुका भा.बौ. महासभा यांनी केले. तर आभार दामोधर राऊत अध्यक्ष भा. बौ. महासभा जि. गडचिरोली दक्षिण यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button