गडचिरोली

इंदाळ्यात ‘मुक्तिपथ’ व पोलिसांची धडक कारवाई; २ महिला दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल!

गाव संघटना आणि पोलिसांच्या संयुक्त छापेमारीत ११५ देशी दारूच्या बाटल्या जप्त; तिसऱ्या संशयिताला कडक इशारा

गाव संघटना आणि पोलिसांच्या संयुक्त छापेमारीत ११५ देशी दारूच्या बाटल्या जप्त; तिसऱ्या संशयिताला कडक इशारा

गडचिरोली दि ५  ऑगस्ट :  गडचिरोली तालुक्यातील इंदाळा येथे सुरू असलेल्या अवैध दारूधंद्यांवर पोलीस विभाग, मुक्तिपथ टीम आणि स्थानिक गाव संघटनेने संयुक्त कारवाई करत जोरदार प्रहार केला आहे. गावात वेगवेगळ्या ३ ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये दोन महिला दारू विक्रेत्यांच्या ताब्यातून ११५ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून दोन्ही आरोपी महिलांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इंदाळा गावात काही महिला छुप्या मार्गाने अवैध दारूची विक्री करत असल्याची पक्की माहिती गाव संघटना व मुक्तिपथच्या टीमला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस, मुक्तिपथ आणि गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावात अचानक संयुक्त शोधमोहीम राबवली.

दोन घरांमधून मुद्देमाल जप्त: पथकाने संशयित कांता शेंडे आणि जनाबाई मेश्राम यांच्या घरावर धाड टाकली असता, त्यांच्या घरातून ११५ देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त केला व दोन्ही महिलांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल केले.

याच कारवाईदरम्यान तिसऱ्या एका संशयित विक्रेत्याच्या घरावरही कसून पाहणी करण्यात आली. तेथे दारू आढळली नाही; मात्र संबंधित विक्रेत्याला अवैध व्यवसाय तातडीने बंद न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचा सज्जड दम प्रशासनाने दिला.

ही यशस्वी कारवाई पोलीस विभागाचे वीरा मानकर, राजू काळंबे आणि गोविंद केकाड यांनी पार पाडली. या मोहिमेदरम्यान गावचे पोलीस पाटील, सरपंच, ग्रामस्थ, मुक्तिपथच्या प्रेरक मेघा गोवर्धन तसेच स्पार्क कार्यकर्त्या अनुश्री सावरकर यांच्यासह गाव संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धडक कारवाईमुळे इंदाळा परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button