गडचिरोलीविदर्भ

संस्कृत ही ज्ञानाची किल्ली; भारताची संपर्कभाषा व्हावी – श्रीश देवपुजारी, गोंडवाना विद्यापीठात ‘संस्कृत दिन’ उत्साहात साजरा

गोंडवाना विद्यापीठात 'संस्कृत दिन' उत्साहात साजरा; तंत्रज्ञानाच्या युगात संस्कृत शिकणे अधिक सुलभ झाल्याचे प्रतिपादन

गोंडवाना विद्यापीठात ‘संस्कृत दिन’ उत्साहात साजरा; तंत्रज्ञानाच्या युगात संस्कृत शिकणे अधिक सुलभ झाल्याचे प्रतिपादन

 

गडचिरोली, दि ३ १  ऑगस्ट : “संस्कृत भाषा आणि भारतीय विचारधारेमुळेच समाजात सुसंस्कार टिकून राहतात. संस्कृत ही आपल्या समृद्ध भारतीय ज्ञानपरंपरेची खऱ्या अर्थाने किल्ली असून, भविष्यात ती भारताची मुख्य संपर्कभाषा म्हणून पुढे यावी,” असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्रीश देवपुजारी यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक इंग्रजी व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘संस्कृत दिना’निमित्त आयोजित विशेष चर्चासत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

मार्गदर्शन करताना देवपुजारी पुढे म्हणाले की, “बदलत्या काळात तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करून भाषा समृद्ध करता येते. सध्याच्या युगात यूट्यूब (YouTube) आणि जेमिनी एआय (Gemini AI) यांसारख्या आधुनिक डिजिटल साधनांचा वापर करून संस्कृत शिकणे अत्यंत सोपे झाले आहे. यासोबतच प्रत्येकाने १५ दिवसांचे ‘संस्कृत संभाषण वर्ग’ आयोजित करून या भाषेचा प्रचार व प्रसार तळागाळापर्यंत केला पाहिजे. कोणत्याही भाषेच्या आत्मसातासाठी तीव्र इच्छाशक्ती आवश्यक असते.”

कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले संस्कृत भारतीचे प्रांत उपाध्यक्ष तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी आपले विचार मांडले. “भारतीय ज्ञानाचा अथांग ठेवा हा मूळ संस्कृत भाषेतच सामावलेला आहे. हा मूळ ज्ञानवारसा आणि भारतीय परंपरा समजून घेण्यासाठी प्रत्येकाने संस्कृत शिकणे काळाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी व्यासपीठावर मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, मराठी विभागप्रमुख डॉ. सविता गोविंदवार यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button