क्राईमगडचिरोलीविदर्भ

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या २७ जनावरांची सुटका

कोरची : तालुक्यातील अतिदुर्गम शिकारीटोला गावाच्या जंगलात कत्तलखान्यात नेण्यासाठी २७ गोवंशांना निर्दयतीने रस्सीने बांधून ठेवले होते. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून २७ गोवंशाची सुटका करून जीवनदान दिले. अमित वालदे रा. मिसपिरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेला कोरची तालुका जनावरांच्या तस्करीचा प्रमुख अड्डा बनला आहे. गोवंशाची कत्तल करण्यासाठी मुक्या जनावरांना तालुक्याच्या जंगल परिसरामध्ये ठिये तयार करून त्या ठिकाणी चारा पाणी न देता रस्सीने बांधून ठेवल्या जाते.

पकडण्यात आलेली जनावरे भंडारा येथील गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. पकडलेल्या २७ जनावरांची किंमत अडीच लाख रुपये आहे. पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतरांचा शोध घेत आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात कोरचीचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या पथकाने कारवाई केली. जनावरांबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button