
95 शेतकऱ्यांची कार्यशाळेला उपस्थिती
गडचिरोली : कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास मंडळ व कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन येथे एक दिवसीय कार्यशाळा गुरुवारी घेण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. वाय. आर. खोब्रागडे, प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
नगरी (ता. गडचिरोली) येथील शेतकरी मनोहर कुंभारे व निमगाव (ता. धानोरा) येथील शेतकरी किशोर चापले यांनी अनुभव कथन केले. विषय तज्ज्ञ सुचित लकडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले तर वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी जिल्ह्यातील फळबाग लागवडीचे महत्त्व विषद केले. शेवटी तंत्र अधिकारी गणेश बादाडे यांनी आभार मानून कार्यशाळेची सांगता झाली.



