नागपूरविदर्भ

काँग्रेसच्या वतीने नागपूर येथे सद्भावना व शांततेचा संदेश देणारी सद्भावना रॅली

नागपूर : महाराष्ट्रात शांतता नांदावी, सर्व धर्म-पंथातील लोकांमध्ये विश्वास आणि एकतेची भावना वृद्धिंगत व्हावी, आणि अशांत नागपूर पुन्हा शांत व्हावे ही प्रार्थना घेऊन १६ एप्रिल रोजी गणेश टेकडी मंदीर, दीक्षाभूमी, ताजबाग दर्गा नागपूर येथे दर्शन करून व छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात सद्भावना शांती मार्च पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, सह प्रभारी कुणाल चौधरी, काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते सुनील केदार, काँग्रेस नेते नितीन राऊत, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार प्रशांत पडोळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार विकास ठाकरे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, माजी आमदार सुभाष धोटे, युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत सह राज्यातील व प्रामुख्याने विदर्भातील काँग्रेसचे सर्व नेते मंडळी, पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button