गडचिरोलीविदर्भ

दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच यांची बैठक

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी तसेच दारू पिण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस पाटील व सरपंच-उपसरपंच यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत २० पोलीस पाटील व १८ सरपंच-उपसरपंच  यांनी सहभाग घेतला.

दारू पिण्यामुळे सामाजिक समस्या, घरगुती हिंसाचार, कौटुंबिक समस्या, झगडे भांडण व अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. त्यासाठी गावातील पोलीस पाटील व सरपंच यांनी काय उपाययोजना कराव्यात, यासाठी मुक्तीपथ व पोलीस विभाग यांनी संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये गावात शांतता व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी पोलीस पाटील यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडून गावातील दारू विक्री बंद करावी असे मुक्तिपथ तालुका प्रेरक विनोद पांडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. उप संघटक आनंद सिडाम यांनी गावातील संघटन करून दारू विक्री कशी बंद करावी याबाबत अनेक उदाहरण देऊन माहिती दिली. मुलचेरा तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी कायदे, कार्य व जबाबदारी बाबत माहिती दिली. आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी पोलीस पाटील व सरपंच कोणत्या कायद्यान्वये गावातील दारू विक्री बंद करू शकतात. दारू विक्रीमुळे समाजात काय परिणाम पडतो याबाबत सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रम यशस्वी घडविण्यासाठी पोलीस विभाग व मुक्तीपथ चमू, स्पार्क कार्यकर्ते रश्मी वाळके व पल्लवी तूपसुंदर यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button