
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम सुकडी डाकराम येथे चैत्र पौर्णिमेच्या पर्वावर श्रीक्षेत्र चक्रधर स्वामींची यात्रा १५ ते २० एप्रिल या कालावधीत पार पडली. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा देण्यासाठी आरोग्य केंद्राद्वारे विशेष शिबिर लावण्यात आले व त्यातून ४५८ नागरिकांना प्रथमोपचार देण्यात आला.
सुकडी डाकराम १५ ते २० एप्रिल या कालावधीत चैत्र पौर्णिमेनिमित्त यात्रा भरत असून यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, महाआरती, महाप्रसाद व सामूहिक विवाह यांचा समावेश असतो. श्रीक्षेत्र चक्रधर स्वामी यात्रेला संपूर्ण विदर्भातूनच नव्हे, तर मध्यप्रदेश राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक येतात. यात्रेदरम्यान ग्रामीण भागातील आदिवासी जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी डाकराम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिव हरिणखेडे नियोजनानुसार यांच्या आरोग्य शिबिर व जनजागृती स्टॉल लावण्यात आले होते. या शिबिरातून ४५८ लोकांना प्रथमोपचार देण्यात आला.
तसेच सहा दिवस सकाळ, दुपार, सायंकाळ आरोग्यसेवक व जलसुरक्षकांच्या मदतीने पिण्याच्या पाण्याची ओटी तपासणी व जलशुद्धीकरण करुन क्लोरिनेशन करण्यात आले. भाविकांसाठी भक्तनिवास, हॉटेल, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे असे एकूण २५ जलस्रोतांचे ओटी तपासणी करण्यात आले होते.
शिबिरासाठी डॉ. स्नेहा दोनोडे, डॉ. प्रीती वालके यांचे मार्गदर्शनात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नमिता गौतम, डॉ. रोहित हरीणखेडे, डॉ. अशोक भगत, डॉ. निशांत डहाटे, आरोग्यसेवक जिलानी कागदी, व्ही. ए. डहारे, राहुल तिरकुले, एम. एस. क्षीरसागर, एस. एच. पुगळे, आरोग्यसेविका दीपाली ठवकर, डी. वाय. पटले, तारा तितिरमारे, शोभा राठोड, पी. टी. नैकाने, श्रद्धा बोरकर, पिंपळकर, कळाम, गणवीर, गुनेरिया, भूषण उईके, सी. बी. घाबर्डे, विजय मेश्राम, सुनील भोले यांनी सहकार्य केले.



