
फिट येऊन पाण्यात पडल्याने मृत्यू ; माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून कुटुंबाला मदत
अहेरी: तालुक्यातील दामरंचा येथील शेतकरी लक्ष्मण पापय्या गावडे (वय ४२) यांचा इंद्रावती नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मासे पकडण्यासाठी नदीवर गेले असताना, त्यांना फिट आल्याने ते पाण्यात कोसळले. फिट आलेल्या अवस्थेत त्यांना पोहणे शक्य न झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
गावडे कुटुंब अत्यंत गरिबीत जीवन जगत होते. त्यांच्या छोट्या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. अशात कुटुंबातील कमावती प्रमुख व्यक्तीच गेल्याने गावडे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात गावडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना आर्थिक मदत दिली.



