महाराष्ट्रमुंबई

पीक विमा उतरवला नसेल तरी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार – कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, आता नुकसान झाल्यास विमा कंपनीवर अवलंबून न राहता थेट शासनामार्फत मदत दिली जाईल, असे महत्त्वपूर्ण विधान कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत केले. “पीक विमा उतरवला नाही म्हणून शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, ही शासनाची भूमिका आहे,” असे ते म्हणाले.

सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या पीक विमा रकमेबाबत प्रश्न विचारला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही सहभाग घेतला.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याची भरपाई दिली गेली आहे. उर्वरित ६९,९५४ विमा अर्जांसाठी ८१.८० कोटी रुपये इतकी अतिरिक्त विमा नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम येत्या ३ ते ४ दिवसांत वित्त विभागाकडून दिली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी यावेळी दिले.

शासनाच्या या भूमिकेमुळे नैसर्गिक आपत्त्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, विशेषतः ज्यांनी पीक विमा काढला नसेल अशा शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button