
चामोर्शी तालुका समितीची बैठक संपन्न
गडचिरोली : चामोर्शी तहसील कार्यालयात जिल्हा दारू व तंबाखू मुक्त विकास कार्यक्रम अंतर्गत तालुका स्तरीय बैठक संपन्न झाली. यावेळी शहर व गाव पातळीवर सुरु असलेल्या अवैध दारू व तंबाखू विक्री विरोधात कृती कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले.
सभेला नायब तहसीलदार आर. एम. वैद्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जावडेकर, उमेदचे व्यवस्थापक पेशटीवार, डॉ. वैष्णवी मार्तीवार, तालुका आरोग्य सहायक भुरसे, समुपदेशक पुप्पलवार, आलीवार, पोलिस विभागाचे कोसमशीले, प्रकाश मडावी, प्रा. मंडल, किशोर चाकूरकर, मुक्तीपथ तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक विनोद पांडे, आनंद सिडाम उपस्थित होते.
यावेळी सर्व शासकीय विभागाच्या १०० यार्ड परिसरातील पानठेले कायम बंद करणे तसेच किराणा दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करणे. पोलीस विभागाने शहरात व गाव पातळीवर असलेले दारू विक्रेत्यावर कारवाईचे करून विक्री बंद करणे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीला दारू व तंबाखूमुक्तीसाठी ग्रामपंचायत समिती स्थापन केल्या असून त्या समितीला कृतिशील करणे. गाव संघटनेला ग्रामपंचायत द्वारे मान्यता देणे. नागरपंचायत द्वारे शहरातील अवैध पानठेला धारकावर पथकाच्या माध्यमातून कारवाई करणे. वन परिक्षेत्रातील अवैध हातभट्टीवर कारवाई करणे. कृती कार्यक्रम राबवून तंबाखूमुक्त शाळा व महाविद्यालय करणे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी कार्यवाही करणे. आशा कार्यकर्त्या यांनी स्तनदा व गरोदर माता याना आपल्या मुलांना कँसर पासून वाचवा या विषयी जागृती कार्यक्रम करणे. प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या व्यसनी रुग्णांना मुक्तिपथ तालुका क्लिनिकला रेफर करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.



