क्राईमगडचिरोलीविदर्भ

अहेरी वनपरिक्षेत्रात निलगायीची शिकार ; अवयव जप्त

अहेरी: अहेरी वनपरिक्षेत्रातील लगाम उपक्षेत्रात एका निलगायीची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिकार केल्यानंतर निलगायीचे अवयव पोत्यात भरून दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या दोन शिकाऱ्यांचा पोलिसांनी पाठलाग केला. मात्र, पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोती रस्त्यात टाकून पळ काढला.

पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या पोत्यांची तपासणी केली असता, एका पोत्यात निलगायीचे शिंग, तर दुसऱ्या पोत्यात दोन पाय आढळून आले. पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे यांनी तातडीने वनअधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. वनअधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पशुधन अधिकारी डॉ. चेतन अलोने यांनी जप्त केलेल्या अवयवांची तपासणी केली आणि त्यानंतर ते अवयव प्रादेशिक न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, नागपूर येथे फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवले आहेत.

लगाम आणि अहेरी उपक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या लागोपाठ दोन घटना उघडकीस आल्याने वन विभागात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे वन्यजीव संरक्षणासमोरील आव्हाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहेत. वन विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरार शिकाऱ्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button