गडचिरोलीविदर्भ

होप फाउंडेशनतर्फे सिरोंचात आभा कार्डचे वितरण

गरजूंना आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्तुत्य उपक्रम

सिरोंचा : गरजू नागरिकांना सरकारी आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी सिरोंचा येथील ‘होप फाउंडेशन’ आणि ‘सार्वजनिक बाल गणेश मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयुष्मान भारत कार्ड आणि वयोश्री कार्ड वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामुळे अनेक गरीब व गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या शिबिराचे उद्घाटन सिरोंचा नगरपरिषदेच्या नगरसेविका महेश्वरी पेद्दापेल्ली आणि माजी नगराध्यक्ष मोगलराजू पेद्दापेल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. शिबिरात होप फाउंडेशनचे सदस्य आणि सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष किष्टय्या मादेशी, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य मित्र राकेश येल्लाकुर्ती, आशा कार्यकर्ती वीणा रादंडी, होप फाउंडेशनचे क्षेत्र समन्वयक शौकत शब्बीर सय्यद यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या शिबिरात वॉर्डातील अनेक गरजू नागरिकांना मोफत ‘आयुष्मान भारत कार्ड’ आणि ‘वयोश्री कार्ड’चा लाभ देण्यात आला. या कार्डमुळे त्यांना सरकारी योजनांतर्गत आरोग्य सेवा आणि इतर आर्थिक लाभ मिळवता येतील. शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोषी पेद्दापेल्ली, सुजाता मादेशी आणि ममता पेद्दापेल्ली यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button