
संत निरंकारी मंडळाचा पुढाकार ; माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
कुरखेडा : संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट, शाखा कुरखेडा यांच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०७ निरंकारी अनुयायी आणि नागरिकांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. विशेष म्हणजे, यात दोन महिलांचाही सहभाग होता.
गेली १४ वर्षांपासून कुरखेडा येथे नियमितपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. संत हरदेव सिंह महाराज यांच्या शिकवणीचे पालन करत निरंकारी मिशनने १९८६ पासून रक्तदान शिबिरे सुरू केली. ‘रक्ताने रक्ताचा बदला न घेता रक्तदान करून श्रद्धांजली अर्पण करा’ या संदेशाला अनुसरून मोठ्या संख्येने अनुयायी दरवर्षी रक्तदान करतात.
या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे होते. यावेळी निरंकारी मंडळाचे गडचिरोली क्षेत्रीय संचालक हरीष निरंकारी, कुरखेडा मंडळाचे प्रमुख माधवदास निरंकारी, भाजप तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, काँग्रेस तालुका अध्यक्ष जिवन पाटील, नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू हूसैनी, माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, वसंतराव मेश्राम, प्रा. कीशोर खोपे, मोनेश मेश्राम, नसिर हाशमी, तानेश ताराम, डॉ. बाबूलाल कावळे, राजेश ऊईके, अमृत मेहर, पूष्पराज रहांगडाले, प्रा विनोद नागपूरकर आदी उपस्थित होते.
गडचिरोली रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. नागेश शाहू आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्राजक्ता दूपारे, प्रयोग शाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे, अधिपरीचारीका टिकेश्वरी करमकर, धम्मप्रीया झाडे, राहूल शिडाम, स्वप्निल चापले, ललीत डोमळे, समता खोबरागड़े, प्रमोद देशमुख, बंडू कूंभारे, मयूर पेंदाम व प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी शिबिरात सेवा दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सेवादल संचालक दिलीप निरंकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



