क्राईमगडचिरोलीविदर्भ

कोरचीत विदेशी दारूसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोघांना अटक

कोरची: कोरची पोलिसांनी दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मोठ्या दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शनिवारी सायंकाळी जांभळी रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी ४० पेट्या विदेशी दारू आणि वाहनासह एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, ज्या वाहनातून ही दारू तस्करी सुरू होती, त्या वाहनावर एका राजकीय पक्षाचे चिन्ह होते, ज्यामुळे या चिन्हाचा फायदा घेऊन ही तस्करी अनेक दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पोलिसांकडून जप्त केलेला हा दारूचा साठा कुख्यात निर्मल धमगाये याचा असल्याचे सांगण्यात आले आहे. निर्मल धमगाये हा अनेक वर्षांपासून दारू तस्करीच्या कामात होता, मात्र मागील दोन वर्षांत त्याने या व्यवसायातून दूर झाल्याचे भासवत ‘वाल्याचा वाल्मिकी’ होत असल्याचे सांगितले होते. कोरची पोलिसांना निर्मल धमगाये आणि त्याचा मुलगा तरुण हे गोंदिया जिल्ह्यातून दारू तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एपीआय मुकूंद देशमुख यांच्या पथकाने सापळा रचून देवरीकडून कुरखेडाकडे येणाऱ्या एका संशयित कारला अडवले. कारवरील राजकीय चिन्ह पाहून ती एखाद्या राजकीय नेत्याची असल्याचे वाटत होते, पण तपासणी केली असता त्यात विदेशी दारूच्या ४० पेट्या आढळल्या. पोलीस दारू आणि वाहनासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी लखन जोहरी बेसा (रा. बेडगाव) आणि धम्म गुणवंता बोरकर (रा. गिधाडी, जि. गोंदिया) या दोघांना अटक केली आहे. त्यांनी चौकशीदरम्यान हा माल निर्मल आणि त्याच्या मुलाचा असल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे पोलीस आता निर्मल धमगाये आणि त्याच्या मुलाचा कसून शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button