
शिक्षण स्वावलंबनातून महिला सक्षमीकरण व सेवाभावी संस्थातून बालकल्याण साधावे – सायली मेश्राम
आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी, येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महिला विकास व सुरक्षा समिती ‘द्वारे आयोजित ‘सेवा ते सस्वयंसेवीक्षमीकरण : स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बदलती दृष्टी ‘या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुण्या भारत ग्रामीण उपजीविका फाउंडेशनच्या सायली मेश्राम, प्रा. स्नेहा मोहुर्ले, प्रा. सुनंदा कुमरे, डॉ. कविता खोब्रागडे उपस्थित होत्या.
सायली मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शन सांगितले की, स्त्री ही कुटुंबाचे हृदय असते. त्या सक्षम झाल्या की संपूर्ण घर, कुटुंब, आणि राष्ट्र सक्षम होते. परंतु आज सुद्धा स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर मुलींना शाळेत जाण्याऐवजी घर कामात गुंतवले जाते. बालविवाह, बालमजुरी, बाल तस्करी या समस्या गंभीर स्वरूपात आहेत. ग्रामीण भागात ही समस्या तीव्र आहे. मासिक पाळी बद्दल अज्ञान, कुर्मागर पद्धती बंद व्हायला पाहिजे. ग्रामीण महिलांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, आत्मविश्वास आणि स्वाभिमान त्यांच्यामध्ये निर्माण करावा लागेल. स्वयंसहायता महिला बचत गट, च्या माध्यमातून महिलांना लघुउद्योग आणि आर्थिक स्वावलंबन अंगीकारले पाहिजे.
सेल्फ एम्प्लॉयमेंट वुमन्स असोसिएशन SEWA, Self Empolyment Women असोसिएशन आणि ‘स्नेहालय’ लैंगिक शोषित, अनाथ मुलींची पुनर्वसन संस्था, नोकरी करणाऱ्या महिलां संस्थां इ. माध्यमातून महिला विकास करीत आहेत. बालकांच्या आणि मुलींच्या विकासासाठी ‘माता बाल सदन ‘क्राय Cry’ (Child Rights And You),’ Pratham, Smile foundation इत्यादी अनेक संस्था अनाथ, अपंग, असहाय बालकांच्या विकासासाठी सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. या संस्थातून बालकांचा विकास साधावा, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या संचालन व प्रास्ताविकातून प्रा. डॉ. कविता खोब्रागडे यांनी महाविद्यालयातील महिला विकास व सुरक्षा समितीचा उद्देश समजावून सांगिला. प्रा. सुनंदा कुमरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयातील सर्व शाखेच्या विद्यार्थिनींनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.



