गडचिरोलीचंद्रपूरमहाराष्ट्रमुख्य बातमीमुंबईविदर्भ

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार जाहीर; पंढरपूरच्या राज्य अधिवेशनात होणार सन्मान

गडचिरोलीचे व्यंकटेश दुडमवार यांच्यासह १० जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांची निवड ; ४ लाख ७० हजार सदस्यांचा सहभाग

आहिल्यानगर : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दिले जाणारे उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाधिकारी पुरस्कार -२०२५ जाहीर झाले आहेत. यामध्ये गडचिरोलीचे व्यंकटेश दुडमवार, जालन्याचे राजेश भालेराव, तसेच रमाकांत पाटील, अनिल करंदकर, मंगल डोंगरे आणि रुपेश पाटील यांच्यासह दहा जणांची उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे.

संघटनेचे मुख्य संयोजक तथा संचालक गोरक्षनाथ मदने यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जगातील ५६ देशांमध्ये कार्यरत आणि ४ लाख ७० हजार पत्रकार सदस्य संख्या असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या जगातील क्रमांक एक पत्रकार संघटनेचे राज्य शिखर अधिवेशन येत्या १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील इस्कॉन सभागृहात होत आहे. याच अधिवेशनात निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा गौरव प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या निवड प्रक्रियेत प्रत्येक विभागातून एक जिल्हाध्यक्ष आणि एक तालुकाध्यक्ष यांची उत्कृष्ट कार्यासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षांमध्ये व्यंकटेश दुडमवार (गडचिरोली), राजेश भालेराव (जालना), रमाकांत पाटील (नंदुरबार), अनिल करंदकर (सातारा), मंगल डोंगरे (ठाणे), रुपेश पाटील (सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे. तर तालुकाध्यक्ष म्हणून राजू कापसे (रामटेक), गंगाधर ढवळे (नायगाव), उमेश काटे (अमळनेर), गणेश आवळे (मिरज) आणि भारत म्हात्रे (वसई) यांची निवड झाली आहे. तसेच विंग स्तरावरही सन्मान जाहीर झाले असून महिला विंगमधून लक्ष्मी वाडेकर (बुलढाणा), साप्ताहिक विंगमधून जितेंद्र जोगड (चंद्रपूर), रेडिओ विंगमधून अनुप फुसके (सातारा) आणि डिजिटल विंगमधून वसंत खडसे (वाशीम) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या निवड प्रक्रियेत अजित कुंकुलोळ, कुमार कडलग, नरेंद्र देशमुख, अमोल मतकर, मिलिंद टोके, बापूराव पाटील, किशोर करंजेकर, वैशाली पाटील, रश्मी मारवाडी आणि किरण ठाकरे यांचा सहभाग होता.

संघटनेचे राज्य फादर बॉडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, महासचिव दिगंबर महाले, कार्याध्यक्ष विजय चोरडिया, मंगेश खाटीक, महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इर्षाद शेख, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष वामन पाठक आणि अब्दुल कईम, व्हॉइस मीडियाचे इलेक्ट्रॉनिक विंगचे राज्य प्रवक्ता व जिल्ह्याचे मार्गदर्शक महेश तिवारी, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय तिपाले, राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, विदर्भ सरचिटणीस सुमित पाकलवार, जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाशमी, जिल्हा सरचिटणीस विलास ढोरे, अहेरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोंड, भामरागड तालुकाध्यक्ष लीलाधर कसारे, आरमोरी तालुकाध्यक्ष ऋषीं सहारे, धानोरा तालुकाध्यक्ष शरीफ कुरेशी, देसाईगंज तालुकाध्यक्ष राजरतन मेश्राम, कुरखेडा तालुकाध्यक्ष विजय भैसारे, चामोर्शी तालुकाध्यक्ष पुंडलिक भांडेकर, एटापल्ली तालुकाध्यक्ष रवी रामगुंडेवार तथा जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी समस्त सदस्य यांनी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button