गडचिरोलीविदर्भ

हनुमान जन्मोत्सवानिमित्त त्रिमूर्ती चौकातील साई मंदिर सदस्यांतर्फे भव्य रक्तदान शिबिर

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची विशेष उपस्थिती ; गरजू रुग्णांच्या मदतीसाठी तरुणांचा मोठा प्रतिसाद

गडचिरोली : हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर केवळ धार्मिक उत्सवापुरते मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकी जपत गडचिरोलीतील त्रिमूर्ती चौक, साई मंदिर येथील सदस्य मंडळींच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश देत तिरुपती क्लिनिक आणि मेडिकल स्टोअर येथे पार पडलेल्या या शिबिरात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

हे शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील रक्तपेढीच्या तांत्रिक सहकार्याने पार पडले. जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना, विशेषतः थॅलेसेमिया आणि आपत्कालीन शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या शिबिराचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “धार्मिक उत्सवांना सामाजिक कार्याची जोड देणे ही काळाची गरज आहे. त्रिमूर्ती चौकातील तरुणांनी हा उपक्रम राबवून समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे.”

या प्रसंगी अंकित गवारे, प्रवीण खडसे, संजूभाऊ कातलापवार, सतीश तडकलावार, सोनू खडसे, पुरुषोत्तम कसानवार, बंडू वाढई, उमाजीभाऊ गेडाम, मुन्ना बावनवाडे यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संजू सोनटक्के, अतुल निनावे, सारंग खडसे, राकेश गेडाम, जगदीश नंदावार, महेश पेटकर, आकाश भांडेकर, रोशन खडसे, राम जवडे, दीपक मुरस्कार, पराग वासेकर, सागर वासेकर, वैभव वासेकर, प्रतीक खडसे, दिलीप खडसे, पराग खडसे, अनुप खडसे, मयूर खोबरागडे आणि रजत गटलेवार यांनी अथक परिश्रम घेतले.

साई मंदिर सदस्य मंडळींनी या उपक्रमाद्वारे केवळ भक्तीच नव्हे, तर शक्तीचे (रक्तदानाचे) महत्त्व देखील अधोरेखित केले आहे. भविष्यातही अशा प्रकारचे विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी सदस्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button