गडचिरोलीविदर्भ

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एक ठार, एक गंभीर जखमी

कुरखेडा : कुरखेडा-वाकडी मार्गावरील नगरपंचायतीच्या डम्पिंग यार्डसमोर शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

गोठणगाव येथील रहिवासी धर्मराज तुळशीराम बोदेले (वय ३५ वर्ष) हे त्यांचे मित्र युवराज ठेंगरे (वय ३४ वर्ष) यांच्यासह दुचाकीने कामानिमित्त वाकडीकडे जात होते. त्याचवेळी वाकडीकडून कुरखेडाकडे येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची समोरासमोर भीषण धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की धर्मराज बोदेले यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मित्र युवराज ठेंगरे हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील चालक रमाकांत कासकर (वय ४८ वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत. कासकर हे कोरची येथील ‘आदिवासी विकास महामंडळाच्या’ कार्यालयात विपणन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने प्रथम उपचारासाठी हलवण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे पाठवण्यात आले आहे.

या भीषण अपघातामुळे कुरखेडा परिसरात आणि गोठणगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button