क्राईमगडचिरोलीविदर्भ

अवैध दारूविक्रीचा प्रयत्न महिलांनी हाणून पाडला ; दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल

गडचिरोली : तालुक्यातील नगरी गावात मागील काही वर्षांपासून यशस्वीरित्या दारूविक्रीबंदी टिकवून ठेवणाऱ्या मुक्तिपथ गाव संघटनेने अवैध दारूविक्रीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे. गावात चोरून-लपून दारू विकणाऱ्या एका विक्रेत्याचा पर्दाफाश करत, महिलांच्या पुढाकारामुळे गडचिरोली पोलिसांनी संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नगरी गावात मुक्तिपथच्या मार्गदर्शनात मागील अनेक वर्षांपासून दारूविक्रीबंदी कायम ठेवण्यासाठी गाव संघटनेचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत. गावातून अवैध दारू हद्दपार करण्यात संघटनेला मोठे यश आले आहे. असे असतानाच, मागील १५ दिवसांपासून एका विक्रेत्याने गावात पुन्हा अवैध दारूविक्री सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगाशी आला आहे. गावात एक विक्रेता चोरून-लपून दारू विकत असल्याची खात्रीशीर माहिती महिलांना मिळाली.

माहिती मिळताच शक्तीपथ संघटनेच्या महिलांनी तातडीने संबंधित विक्रेत्याच्या घराकडचा मोर्चा वळवला. महिला येत असल्याचे पाहून तो दारू विक्रेता दारूचे काही साठे घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, महिलांनी घराच्या आजूबाजूच्या परिसराची झडती घेतली असता, त्यांच्या हाती देशी दारूच्या २ बाटल्या (नग) लागल्या. महिलांनी तात्काळ गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी थेट नगरी गाव गाठले व घटनास्थळाचा पंचनामा करून फरार झालेल्या संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. महिलांच्या पुढाकारामुळे गावात पुन्हा पाय पसरू पाहणाऱ्या अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. गावात पुन्हा अवैध दारू शिरकाव करू नये यासाठी मुक्तिपथच्या वतीने शक्तीपथ महिला संघटनेची बैठक पार पडली असून महिलांना जोडून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button