क्राईमगडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

‘त्या’ बहीण-भावाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

बनावट हस्ताक्षर करून जमीन विक्री प्रकरण

गडचिरोली : शहरातील सोनापूर परिसरातील सर्व्हे क्र. 18/1 ची शेतजमीन अकृषक करून भागीदारांना अंधारात ठेवून थेट विक्री केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी जयश्री चंद्रिकापुरे (निकोसे) व विशाल निकोसे या बहीण-भावाला सोमवारी (दि. 8) अटक केली होती. मंगळवारी, (दि. १) दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही गुरुवारपर्यंत (दि. 11) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे या बहीण-भावासह स्थानिक ठेकेदार नागनाथ (राजू) भुसारे व मनोज सूचक यांनी एकत्रितपणे सोनापूर परिसरातील सर्व्हे नं. 18/1 ची 0.51.59 हेक्टर शेतजमीन सुरेश नैताम यांच्याकडून खरेदी केली. जमीन खरेदीसाठी पैसे नसल्याचे सांगून निकोसे व त्याच्या बहिणीने भुसारे यांच्याकडून 24 लाख रुपये आणि सूचक यांच्याकडून 24 लाख 13 हजार रुपये घेतले. अशा प्रकारे एकूण 48 लाख 13 हजार रुपये जमीन मालकाला दिले. जमिनीची चारही भागीदारांच्या नावे रजिस्ट्री केली. जमीन खरेदी केल्यानंतर नागनाथ भुसारे व मनोज सूचक यांना कोणत्याही प्रकारची भनक लागू न देता जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे या दोन भावंडांनी सहभागीदार भुसारे व सूचक यांच्या खोट्या सह्या करून त्यांचे संमतीपत्र नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे 8 डिसेंबर 2022 रोजी सादर करून सदर जमीन अकृषक केली.

यानंतर भागीदारांची परवानगी न घेता जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे यांनी या जमिनीचे प्लॉट पाडून शितल राहुल ठवरे, डॉ. राहुल रमेश ठवरे, मंगला राजेश भट्टलवार व राहुल मधुकरराव नीलमवार या चौघांच्या नावे करारनामा केला. सदर प्लाटची विक्री 40 लाखांत केली. या संदर्भात निकोसे व बहिणीने भागीदारांची फसवणूक करून जमीन विकल्याचे निदर्शनास आल्यानंतर भुसारे व सूचक यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे आरोपी भाऊ आणि बहिणीला सोमवारी अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक विशाखा म्हैत्रे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button