गडचिरोलीमहाराष्ट्रमुख्य बातमीविदर्भसामाजिक

ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे जनसाहाय्यता कार्यालय बनले जनसेवेचे केंद्र!

विविध योजनांचा लाभ व दाखले उपलब्धीची सोय

गडचिरोली : शासनाच्या योजनांच्या लाभासाठी गोरगरीब नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. त्यामुळे महिला नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होते. ही बाब लक्षात घेऊन अहेरी विधानसभेचे आमदार तथा राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली व अहेरी येथे जनसाहाय्यता केंद्र सुरू केले आहे. हे धर्मरावबाबाचे जनसाहाय्यता केंद्र ‘जनसेवेचे केंद्र’ बनले असून आतापर्यंत ५० हजारहून अधिक महिला नागरिकांना विविधस शासकीय योजनांच्या लाभाचे दाखले उपलब्ध करून देण्यात आले. जनसेवेचे व्रत जोपासून सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांचे काम सुरू असून हजारो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुध्दा मिळाला असल्याची माहिती कार्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे.

ना. धर्मरावबाबाबा आत्राम यांच्या जनसाहाय्यता केंद्राची जबाबदारी धर्मरावबाबांची कन्या तथा गोंडवाना वि‌द्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांनी स्विकारली आहे. गोरगरीब नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच विविध दाखल्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मागील दोन वर्षापासून या जनसेवा केंद्राच्या माध्यमातून गावागावात जाऊन महिला नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले, रहिवाशी दाखले, पॅनकार्ड, आभाकार्ड आदी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी सिनेट सदस्या तनुश्री आत्राम गावागावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्याचबरोबर महिलांना गावातच विविध योजनांचा लाभ मिळाव म्हणून दाखले उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे महिला नागरिकांचा दाखल्यासाठी शासकीय कार्यालयात होणारी पायपीट थांबली असून त्रासापासून सुटक मिळाली आहे. तसेच नागरिकांच्या पैसा व वेळेची बचत सुध्दा झाली असून तनुश्री आत्राम यांच्या सेवा कार्याचे महिला नागरिकांकडून कौतुक केल्या जात आहे.

राज्य शासनाने महिलांसाठी नुकतीच ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत २१ ते ६५ वर्षापर्यंतच्या महिलांना मासिक दीड हजार रूपये वितरीत केले जाणार आहे. राज्य शासनाच्या या लोकप्रिय योजनेबाबत महिला वर्गांनी आनंद व्यक्त केला आहे. अधिकाअधिक गोरगरीब महिलांना ‘योजनेचा लाभ मिळावा म्हणून ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनसाहाय्यता कार्यालयाच्या वतीने योजनेची गावागावात जनजागृती केली जात आहे. यासाठी सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वात त्यांची संपूर्ण यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांची धर्मरावबाबा आत्राम यांच्या गडचिरोली येथील चंद्रपूर मार्गावरील जनसहाय्यता कार्यालयात महिलांची मोठी गर्दी उसळत आहे. महिलांना लाभ मिळावा म्हणून या योजनेचे संपुर्ण अर्ज मोफत भरून देण्याची जबाबदारी स्विकारण्यात आली आहे. कार्यालयात येणार्या महिलांना चायपाण्याची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या महिलांची कोणतीही गैरसोय होऊन नये म्हणून पुरेपुर काळली घेतली जात आहे. कार्यालयातील अनिकेत अग्रवाल यांनी सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button