
गडचिरोली : देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. गडचिरोली शहरातील जुन्या गुजरी मध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारल्या गेले आहे. या ठिकाणी नागरिकांनी व स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूबियांनी स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाप्रसंगी माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, कामगार आघाडी पूर्व विभागीय उपाध्यक्ष नामदेव शेंडे, भाजपाचे माजी शहर अध्यक्ष अविनाश विश्रोजवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या अध्यक्षा पुष्पलता कुमरे, माजी पंचायत समिती सभापती मंगला कोवे, रजनी गोटा, चन्नावार व स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.



