क्राईमचंद्रपूरविदर्भ

चंद्रपुरात गोळीबार ; कुख्यात गुंड हाजी शेखचा मृत्यू

बिनबा गेट परिसरातील शाही दरबार हॉटेलमध्ये झाला गोळीबार

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील महिन्यांपासून गोळीबाराच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसून येत आहे. यातच १२ ऑगस्ट रोजी चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरामध्ये असलेल्या शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवण करत असताना हाजी सरवर शेख नामक इसमावर पाच अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडल्याने गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

प्राप्त माहितीनुसार, घुग्घुस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर शेख हा बिनबा गेट जवळील शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवण करीत असतांनाच अचानक पाच आरोपींनी हाजी शेख याच्यावर हल्ला केला त्यात हाजी अली जाण्यासाठी धावला मात्र आरोपींनी आपल्या बंदुकीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या यात त्याचा मृत्यू झाला.

हाजी शेख याची नुकताच कारागृहातून सुटका झाल्याची माहिती आहे. हाजी शेख यांची मागील पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून अवैध कोळसा व्यापारात त्याचा फार मोठा दरारा होता. त्याच्या हत्येमुळे एक अध्याय समाप्त झाल्याचे बोलल्या जात आहे. हाजी अलीची हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button