
भंडारा : जिल्ह्यात एक ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्यामध्येच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्यामध्ये दोन्ही दिवसामधे 137 अधिकारी/कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, तसेच अन्य काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सोबतच जिल्हा रुग्णालयात महिला अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी कर्करोग निदान तपासण्या करण्यात आले. त्यामध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी 13 महिलांची तपासणी तर स्तन कर्करोग निदानासाठी 15 महिला कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ. शैलेश कुकडे व त्यांच्या चमुने अथक परिश्रम घेतले.
या शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला असून कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेला हा उपक्रम होता. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी देखील आपली आरोग्य तपासणी या शिबिरांमध्ये करून घेतली.
एक ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा राबविण्यात येत असून 15 ऑगस्ट रोजी या महसूल पंधरवड्याचा समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.



