
गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम 20 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.45 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून प्राणहिता हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. प्राणहिता हेलिपॅड अहेरी येथे आगमन व हेलिकॉप्टरने दामरेंचा कडे प्रयाण. सकाळी 10.40 वा. दामरेंचा येथे आगमण. सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वा. दामरेंचा येथील नागरिकांसोबत संवाद बैठक. दुपारी 01.00 ते 01.30 वा. दामरेंचा येथे राखीव. दुपारी 01.45 वा. दामरेंच्या येथील हेलिपॅडवर आगमण व अहेरी कडे प्रयाण. दुपारी 02.30 वा. राजवाडा निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.



