
कूरखेडा : कूरखेडा ते गांधीनगर व पूढे वडेगांव मार्गावर असलेल्या नाल्यावर नविन पूलाचे बांधकाम सूरू आहे. त्यामूळे पूलाच्या बाजूने कच्या मार्गावरून सूरू असलेली वाहतूक पावसाळ्यात येथे पाणी साचल्याने बंद होती. सद्या पाण्याचा रोष कमी झालेला आहे. मात्र पावसाच्या पाण्याने येथे खड्डे पडल्याने येथून वाहन काढणे कठीण ठरत आहे. त्यामूळे संबंधित कंत्राटदाराने येथील खड्डे बूजवत व मूरूम गिट्टी टाकून रस्ता दूरूस्त करावा अशी मागणी माजी पं.स. सभापती गिरीधर तितराम यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग कूरखेडा अंतर्गत संबंधित कंत्राटदाराकडून सदर बांधकाम अतिशय संथ गतीने सूरू असल्याने गांधीनगर, आंजनटोला, वडेगाव तसेच गोंदिया जिल्ह्यातील कन्हाळगांव तूकूम येथील नागरिकांना अडचण होत आहे. मागील चार महिण्यापासून हा मार्ग रहदारीकरीता बंद आहे. त्यामूळे लांबच्या मार्गाने नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. बांधकाम सूरू असलेल्या पुलाच्या बाजूने काढण्यात आलेल्या मार्गाच्या मजबूतीकरणाचे काम संबंधित कंत्राटदार किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात न आल्याने नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सूरू असलेल्या पुलाच्या बांधकामाला अजून अवधी असल्याने पूलाजवळून काढण्यात आलेल्या कच्या मार्गाची तात्काळ दूरूस्ती व मजबूतीकरण करण्यात यावे, अन्यथा बांधकाम विभागाविरोधात ग्रामस्थासह आंदोलन करण्याचा इशारा सूद्धा माजी सभापती गिरीधर तितराम यानी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.



