गोंदियाविदर्भ

विधानसभा निवडणुकीसाठी पोलिस निरीक्षक जिल्ह्यात दाखल

गोंदिया : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षकांची नेमणूक केली आहे. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी तरुण जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवेगावबांध येथे त्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 7821814450 हा मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.

64-तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षक म्हणून हसिफ उर रहमान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुट क्रमांक 2, रेल्वे विश्रामगृह येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 7821868322 हा मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

65-गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षक म्हणून आयपीएस एलनचेजियन यांची नियुक्ती करण्यात आली आहे‌. सुट क्रमांक 4, रेल्वे विश्रामगृह गोंदिया येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 8767049782 हा मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

66-आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षक म्हणून कुंतल किशोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुट क्रमांक 7, रेल्वे विश्रामगृह गोंदिया येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 8830611895 हा मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button