
देसाईगंज :- ओबीसीच्या अनेक कल्याणकारी योजना या महायुती सरकारने आणले आहे. महाराष्ट्रात राजकता निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा आहे. शेवटच्या माणसाचा परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही मैदानात आला आहोत. महाराष्ट्राला विकास मिळेल विकासाची गॅरंटी महायुती सरकार घेणार आहे. महाराष्ट्रात परिवर्तनासाठी महायुतीचे सरकार आले पाहिजे. बहुजन, ओबीसी, शेतकरी यांच्या अनेक कल्याणकारी योजना या महायुती सरकारने आणले आहे. रस्ते, सिंचन, उद्योगातुन अनेक गुंतवणूक आणून आज महाराष्ट्र गुजरातला मागे टाकून देशात एक नंबर आला आहे. राज्यात सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आणि आपल्या विधानसभेचा पुन्हा विकास करण्यासाठी तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार कृष्णा गजबे यांना अधिक मताधिक्याने निवडून आणण्यास जोमात काम करा, असे प्रतिपादन ओबीसी राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी माजी खासदार संगमलाल गुप्ता यांनी केले.
देसाईगंज येथे 6 नोव्हेंबर ला ओबीसी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीत प्रदेश अध्यक्ष संजय गाथे, आमदार कृष्णा गजबे, प्रदेश सदस्य ओबीसी संघटना प्रकाश बघमारे, जिल्हा उपाध्यक्ष मोती कुकरेजा, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा अनिल पोहणकर, माजी नगराध्यक्ष कुरखेडा रवींद्र गोटेफोडे आदी उपस्थित होते.
संजय गाथे म्हणाले, शेतकऱ्यांना 100% बळीराजा मोफत विज योजना, ओबीसीसाठी मोदी आवास योजना, परदेशात सर्वच अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजना, महाराष्ट्रात ओबीसी करिता 36 जिल्ह्यात 72 वसतिगृह मंजूर करण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांना महामंडळाद्वारे अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना मंजूर सुरू करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी आयोगास संविधानिक दर्जा देण्यात आला. केंद्रीय नौदल विद्यालय व केंद्रीय सैनिकी स्कूल मध्ये ओबीसी विद्यार्थी प्रवेश साठी 27 टक्के आरक्षण लागू करण्यात आला. एमबीबीएस आणि एमएस पदवी व पदवीधर प्रवेशांमध्ये ऑल इंडिया कोटा अंतर्गत ओबीसी प्रवर्गाला 27% आरक्षण लागू करण्यात आला. आरमोरी विधानसभात वाचनालयाला मंजुरी मिळून स्पर्धा परीक्षासाठी चालना देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी केले, तर आभार उपसरपंच नेताजी सुंदरकर यांनी मानले. या कार्यक्रमला बहू संख्येने ओबीसी बांधव आणि भगिनी उपस्थित होते.



